Lumpy Skin Disease (LSD) लम्पी स्किन डिसीज

लम्पी स्किन डिसीज 

www.vetpioneers.comपरिचय

⏺ लम्पी स्किन डिजीज हा रोग इ.स १९२९ पासून
१९७८पर्यंत मुख्यत्व आफ्रिकेत आढळत होता. नंतर
हळूवारपणे या रोगाने सभोवतालच्या इतर देशात शिरकाव
केला.

 ⏺ मात्र सन २०१७ नंतर वेगाने या रोगाचा सर्वदूर प्रसार होत आहे आणि आता हा रोग अनेक युरोपीय व आशियाई 
देशात पसरला आहे.

⏺ भारतात सदर रोगाची पहिली नोंद  ऑगस्ट २०१९ मध्ये
ओडिशा राज्यात झाली. नंतर झारखंड, पश्चिम बंगाल,
छत्तीसगड तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ
राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला.

⏺ महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात
(सिरीया) मार्च-२०२० या महिन्यापासून झालेला दिसून
आला आहे.

⏺ तेथील साथिच्या रोगाचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय
रोगनिदान प्रयोगशाळेत झाले आहे.


लम्पी त्वचा रोग म्हणजे काय ?

लम्पी त्वचा रोग हा विषाणू पासून होणारा संसर्गजन्य  रोग आहे पॉक्सीविरिटे (Poxiviridae) जातीमधील कॅप्रीपॉक्स(Capripox) विषाणूमुळे हा रोग होतो.

लम्पी स्कीन डिसीज  हा जनावरातील विषाणूजन्य चर्म रोग आहे. याचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स प्रवर्गात मोडतात. या विषाणूचे शेळी,मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येते. मात्र हा रोग शेळी, मेढयांत अजिबात होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात (३०टक्के) म्हशीच्या (१.६ टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात आहे. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात तीव्रता अधिक असते. रोग सर्व वयोगटात होत असला तरी लहान वासरे ही प्रौढ जनावरांच्या तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडतात. उष्ण दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ जास्त प्रमाणात होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. हिवाळ्यातील थंड वातावरणात प्रसार कमी होतो. रोगामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी  बाधित जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते, काही वेळा गर्भपात होतो. प्रजनन क्षमता घटते. रोगामुळे त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसते. त्यामुळे हा रोग मनुष्यास होईल याची भिती अनेक पशुपालकात निर्माण झाली आहे .परंतु शंभर वर्षाच्या इतिहासात हा रोग मनुष्यात प्रसारीत झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.


या रोगाचा प्रसार कसा होतो?
• मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो.
• विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
 • विषाणू संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये रहातो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होते. त्यातून इतर जनावरांना याचा प्रसार होऊ शकतो. 
 • त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात.
 • विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा प्रसार कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.
 • गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
 • दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व सडावरील व्रणातून रोग प्रसार होतो. लक्षणे

या रोगामध्ये दोन ते तीन दिवसासाठी मध्यम सीनतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावर सर्वत्र कहक घट़ गोलाकर फोडी येतात या फोडीच्या कडा स्पष्ट आणि वर आलेले दिसतात ज्यामध्ये वरची त्वचा, आतील  कातडे आणि स्नायूंचा भाग देखील चिकटलेला आढळतो. काही कालावधी नंतर हे कोड काळे पडतात व त्या वर खपली तयार होते. ही खपली निघून गेली तर एक रुपयाच्या नाण्याप्रमाने मोठा होतो आणि आतली गुलाबी किंवा लाल  रंगाची त्वचा दिसू लागते याशिवाय  जनावराचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न  खाणे, लसिका ग्रंथी मध्ये सूज येणे, पायाला सूुज येणे, पोटा ला सूज येणे. दूध उत्पादन कमी होणे , जनावरामध्ये व्यंधत्व येणे आणि दूध धौलचा प्रमाणात मस्तूक होणे अशी लक्षणे आढळून येतात. म्हणजे जनावरात दहा ते वीस टक्के लागण होण्याचे प्रमाण आहे आणि आणि साधारणपणे एक ते पाच टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.

आजाराचा परिणाम / दीर्घकालीन प्रभाव


या रोगामुळे मृत्यूचे कमी प्रमाण आहे आणि आजारी जनावरे दोन ते तीन आठवड्यामध्ये पूर्णपणे बरे होतात परंतु काहीवेळा दुभ्या जनावरांचे दुधाचे प्रमाण पुढील काही आठवड्यांसाठी कमी होऊ शकते आणि काही जनावरांमध्ये व्यंधत्व आढळून येऊ शकतो. 

नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय


1) आजारी जनावरांना तातडीने वेगळे करावे.
2)अशी लक्षणे दिसणाऱ्या जनावरांना इतर निरोगी जनावरामध्ये मिसाळू देऊ नये.
3) आजारी जनावरे सार्वजनिक कुरणामध्ये चरण्यासाठी घेऊन जाऊ  नये किंवा जे निरोगी जनावरे आहेत त्यांना जनावरांच्या जवळ चारा पाणी करु नये.
 4) बाहय परजीवांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत यामध्ये गोठयामध्ये व निरोगी जनावरां वरती, जनावरांची कीटकनाशके फवारणी  करणें ,मच्छरदानी लावणे आणि माश्या दुर ठेवणारी औषधे यांचा वापर  करणे इत्यादी गोष्टीचा समावेश होतो.

५) अशी लक्षणे आढळलेल्या गावांमधुन इतर गावांमध्ये जनावरांची वाहतूक , बाजार आणि इतर दळणवळण बंद 
करावे.
6) या आजारामुळे दगावलेल्या जनावरांना खोल खड्डा करुन  पूरुन घ्यावे यामुळे त्याची लागण इतर निरोगी जनावरांमध्ये टाळता येते.
 7) आजारी जनावरांचा वापर संकर करण्यासाठी टाळावा आणि आजारी जनावरापासून मिळणारे निरस दूध न वापरता ते पूर्णपणे उकळुन   नंतर वापरावे.


उपचार

1) पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात मात्रे नुसार प्रतिजैविके द्यावीत.
2) ताप आणि सूज कमी करण्यासाठी औषधे द्यावीत. 

3) ज्या ठिकाणी गाठी फुटून जखमा होतात त्या प्रत्येक ठिकाणी संसर्ग रोधक मलम लावावे आणि माशा बसू नये यासाठी फवारणी करता येणारे औषध वापरावीत.
4) खाद्यामध्ये मऊ पातळ आणि रसदार असा चारा द्यावा. यासोबत खनिज मिश्रण द्यावे.

५) याच्या व्यतिरिक्त इतर लक्षाणांसाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.

( विशेष सुचनाआपल्याकडील जनावरांच्यामध्ये लम्पी स्कीन डिसीज  लक्षणे आढळून आल्यास  पशूपालकांनी पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करून घ्यावेत.)
    
Special Thanks To  Dr. Angad Bankar 

Comments

 1. अतिशय थोडक्यात आणी परफ़ेक्ट आहे

  ReplyDelete
 2. 🙏👍 मराठीत दिल्या बद्दल धन्यवाद. या माहितीचा प्रसार जास्तीत जास्त पशूपालका पर्यंत होयला पाहिजे.

  ReplyDelete
 3. Impressive and powerful suggestion by the author of this blog are really helpful to me.
  Equine Assisted Therapy

  ReplyDelete

Post a Comment